लेवा पाटीदार समाजाचा भव्य-दिव्य आंतरराष्ट्रीय विवाहेच्छू वधू-वर मेळावा – पुण्यात ८ नोव्हेंबर रोजी
लेवा पाटीदार समाजाचा भव्य-दिव्य आंतरराष्ट्रीय विवाहेच्छू वधू-वर मेळावा – पुण्यात ८ नोव्हेंबर रोजी
लेवाजगत न्यूज पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):
लेवा पाटीदार समाजाचा भव्य-दिव्य आंतरराष्ट्रीय विवाहेच्छू वधू-वर पालक मेळावा शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते सायं. ४.०० वा. या वेळेत निवृत्ती लॉन, रावेत, पिंपरी चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे आयोजन समता भ्रातृ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सौ. केतकी पाटील, मा. श्री. मोरेश्वरभाऊ भोंडवे, आणि मा. श्री. नामदेवदादा ढाके उपस्थित राहणार आहेत. तसेच समाजातील नामवंत उद्योजक आणि मान्यवरांमध्ये श्री. विलास बोरोले, डॉ. सागर राणे, श्री. शिवाजी साकेगावकर, श्री. किरण पाटील, श्री. नितीन बोंडे, डॉ. पवन भोळे, श्री. किशोर नारखेडे, श्री. अनिल परतणे यांचा सहभाग राहणार आहे.
या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रतिसादानुसार भव्य-दिव्य ऑफलाईन मेळाव्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) तसेच रंगीत वधू-वर सुचीची हार्ड कॉपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपस्थित वधू-वर पालकांना प्रत्यक्ष सुसंवाद व चर्चेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
समाजातील सर्व बांधवांना सहभागी होण्यासाठी मंडळाने आवाहन केले असून, ऑनलाईन नोंदणीसाठी www.samatabhratrumandal.com या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. तसेच माहितीकरिता टोल फ्री क्रमांक ०२०-७११७३७३३ वर संपर्क साधावा, असे समता भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमंत श्रीरंग झोपे व सचिव श्री. रविंद्र नामदेव बहाटे यांनी कळविले आहे.


.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत