लेवा भूषण सुनील इंगळे यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार” प्रदान
लेवा भूषण सुनील इंगळे यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार” प्रदान
पुणे (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी)
पत्रकारिता, सामाजिक सेवा आणि जनजागृतीच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या लेवा भूषण श्री. सुनील इंगळे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा सन्मान मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय - केंद्र सरकार, निती आयोग संलग्न दिल्ली येथील डॉ. रविंद्र भोळे आरोग्य केंद्र यांच्या वतीने प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेघाताई कुलकर्णी यांनी भूषवले होते.
हिंदू रत्न सन्माननीय डॉ. रविंद्र भोळे (अध्यक्ष - मणिभाई मानव सेवा ट्रस्ट) तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुनील इंगळे यांनी सांगितले की —
“भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय एकता दिनी त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने मी धन्य झालो आहे. मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचे, सहकाऱ्यांचे आणि मित्रपरिवाराचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
सुनील इंगळे हे गेली ४० वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. ते बहिणाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व बहिणाई वार्तापत्राचे संपादक आहेत. तसेच जीवनदाता सामाजिक संस्था, जायन्टस क्लब, जनजागृती सेवा समिती, ग्लोबल खान्देश मंडळ, पत्रकार उत्कर्ष समिती, प्रेरणा फाउंडेशन, महाराष्ट्र गौरव परिवार आदी संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे.
नेत्रदान आणि देहदानाचा संकल्प करून त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. आजपर्यंत ७० हून अधिक सन्मान आणि पुरस्कारांनी गौरवलेले असलेले सुनील इंगळे हे समाजाभिमुख आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
या यशाबद्दल समाजातील मान्यवर, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
— लेवा जगत न्यूज


.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत