कु. डाळींबी उर्फ प्रियंका सरोदे यांचा लेवा युथ फोरम बदलापूर तर्फे सत्कार
कु. डाळींबी उर्फ प्रियंका सरोदे यांचा लेवा युथ फोरम बदलापूर तर्फे सत्कार
लेवजगत प्रतिनिधी (खेमचंद पाटील बदलापूर):-
लेवा युथ फोरम बदलापूर तर्फे आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने लेवा पाटीदार समाजातील रावेर तालुक्यातील रोझोदा येथील सर्वसाधारण शेतकरी रविंद्र चुडामन सरोदे आणि सुवर्णा रविंद्र सरोदे यांची मुलगी कु. डाळींबी उर्फ प्रियंका रवींद्र सरोदे ह्या सध्या रावेर तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनी एम.पी.एस.सी. च्या राज्यसेवा परिक्षेत राज्यातून ओबीसी प्रवर्गातून सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले.
त्यानिमित्ताने लेवा युथ फोरम बदलापूर तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी लेवा युथ फोरम बदलापूर अध्यक्ष हितेश भोळे, केंद्रीय अध्यक्ष हर्षल भंगाळे, महाजन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. चेतन महाजन , बालाजी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. राहुल चौधरी, हर्षल जावळे, विकास भंगाळे यांच्यासह अमोल पाटील , प्रीतम पाटील, मोहन चौधरी आणि बदलापूर, ठाणे डोंबिवली, पुणे, मुंबई, नवी मुंबई येथील लेवा युथ फोरमचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते. लेवा पाटील समाजासह परिसरात प्रियंका ताईंचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत