डिजिटल अरेस्ट; बामणोदच्या वृद्ध शेतकऱ्याला ₹९.५० लाखांचा ऑनलाईन गंडा
डिजिटल अरेस्ट; बामणोदच्या वृद्ध शेतकऱ्याला ₹९.५० लाखांचा ऑनलाईन गंडा
लेवाजगत न्यूज | प्रतिनिधी : जळगाव
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने धमकावून बामणोद (ता. यावल) येथील एका ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला तब्बल ₹९ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.
ठगांनी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे पोलिस युनिफॉर्म आणि मुंबई पोलिस लोगोचा वापर करून शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश काशिराम नेहेते (वय ६७, रा. बामणोद) यांना ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फोन आला. समोरील व्यक्तीने स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून, नेहेते यांच्या हरवलेल्या आधार कार्डावर कॅनरा बँकेत खाते उघडले असून त्यात २० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर पोलिस वेशातील ठगांनी नेहेते यांना सांगितले की, “तुमच्यावर मनी लॉन्डरिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा गुन्हा कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल आहे.”
या धमकीला घाबरून नेहेते यांनी ठगांनी सांगितल्याप्रमाणे बँक खात्याचे तपशील आणि व्यवहाराची माहिती दिली.
यानंतर ठगांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ₹९ लाख ५० हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून सायबर पोलीस तपास सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत