सावद्यात अनुसूचित जाती राखीव नगराध्यक्ष पदासाठी दिपाली राहुल धांडे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर
सावद्यात अनुसूचित जाती महिला राखीव नगराध्यक्ष पदासाठी दिपाली राहुल धांडे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर
लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी : सावदा शहरातील लेवा पाटीदार समाजातील एस.सी. सून, शहरातील माहेर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी कैलास वाशी रेवा बळीराम धांडे यांच्या सुनेने, दिपाली राहुल धांडे यांनी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.
दिपाली धांडे यांचे पती राहुल धांडे हे सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून त्यांचा परिसरात व्यापक जनसंपर्क आहे. अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित असलेल्या सावदा पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी जाहीर केली असून, परिसरातील नागरिक, वाड्यातील रहिवासी आणि समाज बांधवांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
.jpg)

.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत