Contact Banner

दिघी, पुणे येथे भव्य वधू-वर मेळावा २०२५ -सकल लेवा पाटीदार समाजाचा उपक्रम

 


दिघी, पुणे येथे भव्य वधू-वर मेळावा २०२५ -सकल लेवा पाटीदार समाजाचा उपक्रम

दिघी, पुणे येथे भव्य वधू-वर मेळावा २०२५ -सकल लेवा पाटीदार समाजाचा उपक्रम


लेवाजगत न्यूज | प्रतिनिधी : पुणे-सकल लेवा पाटीदार समाजासाठी श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान, दिघी आणि ‘तुझं माझं जमलं विवाहमंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधू-वर मेळावा २०२५ आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी, सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत, श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान, दिघी, पुणे येथे होणार आहे.




हा मेळावा समाजातील सर्व इच्छुक वधू-वरांना एकत्र येऊन संवाद साधण्याची आणि आयुष्यभराच्या नात्याची सुंदर सुरुवात करण्याची सुवर्णसंधी देणारा ठरणार आहे.या कार्यक्रमात समाजाच्या एकतेचे दर्शन घडविण्यासोबत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विवाहबंधनाची नवी दिशा देण्याचा उद्देश आहे.

Tuz Maz Jamal Matrimony तर्फे विनामूल्य नावनोंदणी सुरू असून ती फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे 👉

 www.tuzmazjamal.com

नोंदणीची अंतिम तारीख: १५ नोव्हेंबर २०२५

 मेळाव्याचे स्थळ: श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान, दिघी, पुणे ,वेळ: सकाळी ११.०० ते सायं. ५.००


📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:

श्री. अमोल पाटील : ९८२२८००४२७

श्री. दिपक पाटील : ९३०७६०२१५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.