फैजपूरमध्ये कमळावर विश्वास कायम; तीन प्रभागांत बिनविरोध विजय
फैजपूरमध्ये कमळावर विश्वास कायम; तीन प्रभागांत बिनविरोध विजय
लेवाजगत न्यूज फैजपूर :-फैजपूर नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये भाजप–शिवसेना महायुतीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून प्रभाग क्र. ५ अ, ६ ब आणि १० अ मधील उमेदवारांचा बिनविरोध विजय नोंदविण्यात आला आहे. विकास, पारदर्शकता आणि जनसेवा या भूमिकेला फैजपूरकरांनी दिलेला हा विश्वास असल्याचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रभाग क्र. ५ अ मधून सौ. निलिमा राजेश महाजन, प्रभाग क्र. ६ ब मधून श्री. सागर हरिचंद्र होले तसेच प्रभाग क्र. १० अ मधून श्री. सिद्धेश्वर लिलाधर वाघुळदे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. या तिन्ही उमेदवारांचे पक्षाकडून स्वागत व अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या विजयानंतर प्रभागातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला.
महानगरपालिका कार्यक्षम, सुव्यवस्थित व पारदर्शक प्रशासनासह पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि जनहिताचे निर्णय या प्राथमिकतांवर काम करण्यात येणार असल्याचे भाजपा कडून स्पष्ट करण्यात आले. या विजयातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आगामी सर्व प्रभागांमध्येही विजयाची दिशा देणारी ठरेल, अशी प्रतिक्रीया यावेळी व्यक्त करण्यात आली.
विजय उमेदवारांचे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार दामिनी पवन सराफ यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत