माघारीनंतर सावदा नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट; दोन ‘ब’ व दहा ‘ब’ प्रभागात शिवसेना उमेदवार बिनविरोध विजयी
माघारीनंतर सावदा नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट; दोन ‘ब’ व दहा ‘ब’ प्रभागात शिवसेना उमेदवार बिनविरोध विजयी
लेवाजगत न्यूज सावदा:-
सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आज माघारीची प्रक्रिया पार पडल्याने निवडणुकीचे एकूण चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक दोन ‘ब’ आणि दहा ‘ब’ या दोन्ही प्रभागांमध्ये काही उमेदवार छाननीत अपात्र ठरले होते. त्यानंतर आज दहा ‘ब’ प्रभागातील उर्वरित उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने या दोन्ही प्रभागात स्पर्धा संपुष्टात येऊन शिवसेना (शिंदे गट) उमेदवार बिनविरोध विजयी ठरले.
त्या अनुषंगाने —
- प्रभाग क्रमांक दोन ‘ब’ मधून तबस्सुम बानो फिरोज खान
- प्रभाग क्रमांक दहा ‘ब’ मधून फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण
हे दोन्ही उमेदवार मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन, रावेर लोकसभा निवडणूक प्रभारी नंदू महाजन आणि शिवसेना निवडणूक प्रभारी छोटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी–शिवसेना युतीतर्फे बिनविरोध निवडून आले आहेत.
नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे या बिनविरोध निवडीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी निवडणुकीत युतीचा आत्मविश्वास वाढल्याची चर्चा आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत, "सावद्यातील विकासदृष्टीने ही निवडणूक निर्णायक ठरेल व जनतेला विकासाचे आश्वासन आम्ही पूर्ण करू," असे प्रतिपादन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत