फैजपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभाग क्रमांक ४ मध्ये दामिनी सराफ यांचा प्रचार दौरा
फैजपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभाग क्रमांक ४ मध्ये दामिनी सराफ यांचा प्रचार दौरा
लेवाजगत न्यूज फैजपूर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. दामिनी पवन सराफ यांनी प्रभाग क्रमांक ४ मध्ये प्रचार दौरा करत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. किरंगे वाडा, सुभाष चौक रोड, चावळी, त्रिवेणी वाडा, महाजन मेडिकल मागील परिसर, सतपंथ मंदिर परिसर आणि खुशाल भाऊ रोड या भागात भेटीगाठी घेऊन स्थानिक गरजा, सध्याच्या अडचणी व प्राधान्याने करावयाच्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली.
प्रत्येक कुटुंबाच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी ठोस व नियोजनबद्ध मार्ग आखण्याचा प्रयत्न असल्याचे दामिनी सराफ यांनी सांगितले. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांकडून मिळालेला आशीर्वाद व अनुभव हीच आमच्या कार्याला दिशा देणारी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सूचनांमधून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग स्पष्ट होतो, असेही त्या म्हणाल्या.
फैजपूर शहरातील नागरिकांकडून मिळणारा विश्वास, प्रेम आणि सहकार्य हीच कार्याची खरी प्रेरणा असल्याचे सांगत उत्कृष्ट सुविधा, सुशासन व विकासाची गती अधिक वाढवण्याचे आश्वासन सराफ यांनी दिले. नागरिकांच्या सततच्या पाठिंबा व शुभेच्छांसाठी त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत