Contact Banner

जामनेर नगराध्यक्षपदी साधना गिरीश महाजन बिनविरोध, मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम

 

jamner-nagaradhyakspadi-sadhana-girish-mahajan-binavirodh-mantri-girish-mahajan-nirvivaad-varchasva


जामनेर नगराध्यक्षपदी साधना गिरीश महाजन बिनविरोध, मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम

लेवाजगत न्यूज जळगाव -दि-20/11/2025, जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मंगळवारी (ता. १८) रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेकांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान भाजपाचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निश्चीत झाले आहे. यात भुसावळ येथे वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध निश्चीत झाल्या आहेत. 

जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अनेक मातब्बरांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान, मतदान होण्या आधीच भाजपाने जिल्ह्यात तीन ठिकाणी खाते उघडून आघाडी घेतली आहे. अशात पुन्हा एक मोठी बातमी समोर आली असून, जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड निच्छित झाली आहे. विशेषतः यामुळे साधना महाजन यांनी बिनविरोध हॅट्रिक साधली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात नवा अध्याय दिला गेला आहे.जामनेर नगरपरिषदेच्या मतदानापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन या बिनविरोध निवडून आल्याने आता जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर व सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक पदाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या तीन जागांवर भाजपला बिनविरोध करण्याला यश मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.