Contact Banner

फैजपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ भाजपच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — विकासाच्या निश्चयाची घोषणा


fjp-nagarparishad-bjp-campaign-response-2025


 फैजपूर नगरपरिषद निवडणूक २०२५

भाजपच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — विकासाच्या निश्चयाची घोषणा

लेवाजगत न्यूज फैजपूर (प्रतिनिधी) — आगामी फैजपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शहरातील विविध भागात घराघर भेटी आणि संवाद उपक्रमांद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. काल झालेल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना स्थानिक समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. अनेक नागरिकांनी शहरातील विकासकामांची गती थांबली असून ती पुनः सुरू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संवाद दौऱ्यात नागरिकांनी प्रामुख्याने दर्जेदार रस्त्यांची आवश्यकता, नियमित व शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनातील सुधारणा, स्ट्रीट लाईट व सुरक्षा सुविधा तसेच सार्वजनिक उद्याने आणि मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी या महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. या सर्व सूचनांची नोंद घेऊन प्रत्येक समस्येवर तात्काळ आणि नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचा निर्धार भाजप पक्षाकडून व्यक्त करण्यात आला. घराघरातून मिळणारा विश्वास, समर्थन आणि निस्वार्थ प्रेम हीच आमच्या कार्यासाठीची सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. निवडणूक हा फैजपूरच्या भविष्याचा निर्णायक क्षण असून शहराच्या विकासमार्गाची दिशा ठरविणारा प्रत्येक मत महत्त्वाचा असल्याचे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.