Contact Banner

अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांचा मृत्यू; नातलगांचा अनैतिक संबंधांचा आरोप, आत्महत्या की अन्य कारण?

 

gauri-palwe-anant-garjey-mumbai-death-family-allegations-police-investigation


अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांचा मृत्यू; नातलगांचा अनैतिक संबंधांचा आरोप, आत्महत्या की अन्य कारण?


लेवाजगत न्यूज | मुंबई:- महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून कार्यरत असलेल्या अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे (दंत विभाग, KEM रुग्णालय) यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचा विवाह झाला होता.


घटनेनंतर गौरीच्या नातेवाईकांनी गौरीने आत्महत्या केली नसून ती मजबूत आणि लढाऊ स्वभावाची मुलगी होती, असा दावा करत अनंत गर्जे मानसिक त्रास देत होते असा गंभीर आरोप केला आहे.

दोन महिन्यांपासून वाद असल्याचा दावा

गौरीचे मामा शिवदास पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरू होते.त्यांच्या म्हणण्यानुसार गौरीला अनंत गर्जे यांचे अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय आला होता. "तिने माफही केले, तरीही चॅटिंग सुरुच होते," असा दावा त्यांनी केला.

मामांच्या म्हणण्यानुसार, भांडणाच्या वेळी अनंत गर्जे यांनी स्वतःच्या हातावर वार करून, “मी पण मरेन आणि तुलाही गुंतवेन,” असे म्हणत मानसिक दबाव टाकला होता, असा आरोप करण्यात आला आहे.

पुराव्यांचा दावा, पोलिसांना दिल्याची माहिती

गौरी पालवे यांच्यासमोरच आत्महत्या झाली असा दावा अनंत गर्जे यांनी पोलिसांसमोर केला असल्याचे सांगितले जात आहे. यावर त्यांच्या नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित करत, "जर आत्महत्या होत होती तर थांबवले का नाही?", असा सवाल केला. तसेच, गौरीच्या वडिलांकडे संबंधित चॅटिंगचे पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

घटनेनंतर अनंत गर्जे फरार झाल्याची नातेवाईकांची माहिती असून, पोलीस तपास सुरू आहे.

पंकजा मुंडे यांचा यात सहभाग नसल्याचा दावा

“पंकजा ताईंचा यात काही विषय नाही. त्यांना अनंत गर्जे बद्दलची माहिती माहिती नव्हती,” असे गौरीच्या नातलगांनी सांगितले. त्यांनी पुढे दावा केला की, "त्यांना सत्य माहिती असती तर त्यांनी त्याला दूर केले असते."

पोलिस तपास सुरू

या घटनेबाबत पोलिसांनी प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूची कारणमीमांसा व आरोपांची पडताळणी तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.