सावदा पालिका निवडणुकीत माघारीनंतर चित्र स्पष्ट; पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला वेग, अपक्ष अडचणीत
सावदा पालिका निवडणुकीत माघारीनंतर चित्र स्पष्ट; पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला वेग, अपक्ष अडचणीत
लेवा जगत न्यूज सावदा-
सावदा नगरपरिषद निवडणुकीत माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले असून आता प्रचाराला वेग मिळाला आहे. ज्या उमेदवारांना पक्ष तर्फे एबी फॉर्म देण्यात आला आहे त्यांनी अधिकृत चिन्हासह घरोघरी संपर्क मोहिमेस सुरुवात केली आहे. मतदारांशी थेट संवाद साधत ते प्रचार मोहीम राबवत आहेत.
दरम्यान, अपक्ष उमेदवारांना अजून मतदान चिन्हाची घोषणा २६ तारखेला होणार आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ चार दिवस उपलब्ध राहतील. यामुळे अपक्ष उमेदवारांची कुचंबना झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सध्या चिन्ह न मिळाल्याने अनेक अपक्ष उमेदवार घराघर भेटी देत तोंडी प्रचारावर भर देत आहेत, मात्र अधिकृत निवडणूक चिन्ह नसल्याने जनसंपर्क मोहीम मर्यादित होत असल्याचे दिसत आहे.
निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येत असताना प्रत्येक उमेदवार प्रत्यक्ष संपर्कावर जोर देत असून प्रचार रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत