भाजपमध्ये येवले दाम्पत्याचा पुनःप्रवेश — सावदा राजकारणात खळबळ
भाजपमध्ये येवले दाम्पत्याचा पुनःप्रवेश — सावदा राजकारणात खळबळ
लेवा जगात न्यूज, सावदा —रावेर बाजार समितीचे माजी संचालक पंकज येवले यांनी त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह माजी नगरसेवक अजय भारंबे ,स्वगृही परतत भारतीय जनता पक्षात पुनःप्रवेश घेतल्याने सावदा आणि परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना आज सावदा नगरीत ही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. दीपक लोमटे यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात येवले दाम्पत्यांनी भाजपा प्रवेश केला. ना. महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याच कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष एकलव्य कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते गजू ठोसरे, माजी नगरसेवक सुधाकर पाटील नितीन पाटील, मनीष पाटील, तसेच विशाल सोनवणे आणि शेरखा तडवी,अतुल नेहते,सचिन बरहाटे, बंटी बढे आदींनीही आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला स्थानिक स्तरावर नवीन बळ प्राप्त झाले असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या सोहळ्यास ना. गिरीशभाऊ महाजन, आ. अमोल जावळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 सावदा प्रतिनिधी — लेवा जगात न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत