Contact Banner

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांचा बिगुल वाजला; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी

state-municipal-elections-announced-voting-on-december-2-results-on-december-3


राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांचा बिगुल वाजला; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी

लेवाजगत न्यूज मुंबई :
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेत 246 नगरपरिषदां व 42 नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या दोन्ही संस्थांसाठी मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींमध्ये एकूण 6859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

या 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश असून 236 नगरपरिषदांची मुदत आधीच संपली आहे. राज्यातील एकूण 147 नगरपंचायतींपैकी 42 नगरपंचायतींसाठी या वेळी निवडणूक होत आहे. यापैकी 15 नव्याने स्थापन झालेल्या असून, 27 नगरपंचायतींची मुदत संपलेली आहे.


*भारतीय जनता पार्टी, जळगाव पूर्व जिल्ह्याची बैठक आज सावदा येथील जीरा मॅरेज हॉलमध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली* https://youtu.be/niJEsPG-mZ4


नगरपरिषदेची सदस्यसंख्या साधारणतः 20 ते 75 दरम्यान असते. बहुसदस्यीय पद्धतीनुसार नगरपरिषदेतील एका प्रभागात साधारणतः 2 जागा असतात, तर सदस्यसंख्या विषम असल्यास 3 जागा ठेवण्यात येतात. त्यामुळे मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी मतदान करावे लागणार आहे.
नगरपंचायतींसाठी मात्र 1 अध्यक्ष आणि 1 सदस्य निवडला जातो, त्यामुळे मतदारांना दोन मते द्यावी लागतील.

निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. आयोगाने यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले असून उमेदवारांना त्या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. एका प्रभागात एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 उमेदवारी अर्ज सादर करता येतील. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावी लागेल.

उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे. मात्र, ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला आहे, ते अर्जाच्या पावतीच्या आधारेही उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.