प्रा. प्रिती महाजन यांना लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स विषयात डॉक्टरेट पदवी
प्रा. प्रिती महाजन यांना लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स विषयात डॉक्टरेट पदवी
लेवाजगत प्रतिनिधी खेमचंद पाटील —जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. प्रिती नितीन महाजन यांना लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयात डॉक्टरेट पदवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावकडून प्रदान करण्यात आली.
ही पदवी माननीय कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी प्रा. कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य मा. राजेंद्र नन्नवरे, मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, मार्गदर्शक डॉ. तुषार मल्हार पाटील, प्राचार्य सुनील कुवर, प्राचार्य व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. प्रिती महाजन या जळगाव येथील शिक्षक दाम्पत्य गंगाधर रामदास पाटील आणि विमल गंगाधर पाटील यांच्या कन्या असून, नितीन सुखदेव महाजन (सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, जळगाव) यांच्या पत्नी आहेत.
त्यांना एस.एस.व्ही.पी.एस. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिंदखेड येथील डॉ. तुषार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
स्व. गोदावरी पाटील यांच्या प्रेरणेसह आणि संस्थेचे संस्थापक डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांचे प्रोत्साहन त्यांच्या यशामागे कारणीभूत ठरले आहे.
लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स हे ज्ञान व तंत्रज्ञान यांना जोडणारे महत्त्वाचे क्षेत्र असून, त्यांच्या संशोधनामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व संशोधकांना नवीन दिशा मिळणार आहे.
त्यांचा थिसीसचा विषय —
“A Scientometric Study of the Science and Technology Faculty of the KBC North Maharashtra University and Its Affiliated Colleges”
या अभ्यासातून केबीसीएनएमयू विद्यापीठाच्या संशोधन उत्पादन, शैक्षणिक कामगिरी, सहयोगी नेटवर्क आणि सामाजिक सहभागाबद्दल महत्त्वाचे दृष्टिकोन प्राप्त झाले आहेत. हा संशोधन अभ्यास भविष्यातील संशोधक, प्रशासक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.


.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत