Contact Banner

रावेर–यावल परिसरात प्रथमच मुक्ताई संस्थानचा फिरता नारळी सप्ताह; कुंभारखेडा येथे 17 ते 24 मार्चदरम्यान भव्य आयोजन

 

raveryawal-muktai-firta-narali-saptah-kumbharkheda-17-to-24-march


रावेर–यावल परिसरात प्रथमच मुक्ताई संस्थानचा फिरता नारळी सप्ताह; कुंभारखेडा येथे 17 ते 24 मार्चदरम्यान भव्य आयोजन

 लेवाजगत न्यूज रोझोदा:- या पवित्र तीर्थक्षेत्री, भगवान श्री कामसिद्ध महाराजांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान यांच्या फिरता नारळी सप्ताहाच्या नियोजनाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आज सोमवार दुपारी तीन वाजता पार पडली.

यंदाच्या वर्षीचा नारळी सप्ताह रावेर आणि यावल तालुक्यांनी प्रथमच स्वीकारला असून या आठ दिवसांच्या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन कुंभारखेडा, ता. रावेर येथे 17 ते 24 मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व नियोजन या बैठकीत अंतिम करण्यात आले.

या सोहळ्यात भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.

मुख्य आकर्षणे:

पहाटे 4 वाजता अखंड हरिनाम संकीर्तन

देशभरातील नामवंत व राष्ट्रीय कीर्तनकारांचे कीर्तन

तीन दिवस – श्रद्धेय चैतन्य महाराज देगलूरकर यांचे ज्ञानेश्वरी निरूपण

सकाळ–संध्याकाळ कीर्तन

दुपारी प्रवचन

दररोज ज्ञानेश्वरी पारायण

यावेळी विशेष म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सिद्ध चरण पादुका प्रथमच रावेर–यावल परिसरात आगमन करणार असून सात दिवस भाविकांना त्यांचे पवित्र सान्निध्य लाभणार आहे. हा न भूतो न भविष्यति असा योग संपूर्ण परिसरासाठी अत्यंत पुण्यदायी ठरणार आहे.


बैठकीस श्रद्धेय रवींद्र महाराज हरणे, श्री नरेंद्रभाऊ नारखेडे, विविध कीर्तनकार, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

या भव्यदिव्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी लेवा जगत न्यूज वेबसाईट चॅनलच्या माध्यमातून सर्व भाविक, युवक–युवती आणि समाजबांधवांना आवाहन केले आहे की —

“सप्ताहाच्या आयोजनासाठी सर्वांनी तन–मन–धनाने सहकार्य करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.