सावदा -प्रभाग १ ‘अ’ मध्ये ममता रशीद तडवी यांची धडाकेबाज प्रचारमोहीम; स्वच्छ-सुंदर सावदा व अंडरग्राउंड सांडपाणी योजनेवर भर
सावदा -प्रभाग १ ‘अ’ मध्ये ममता रशीद तडवी यांची धडाकेबाज प्रचारमोहीम; स्वच्छ-सुंदर सावदा व अंडरग्राउंड सांडपाणी योजनेवर भर
लेवाजगत न्यूज सावदा:- सावदा नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक १ ‘अ’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या घड्याळ चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून ममता रशीद तडवी यांनी प्रचाराची दमदार सुरुवात केली आहे. शहराचे नेतृत्व करीत असलेल्या राजेश भाऊ वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तडवी यांनी स्वामीनारायण नगर, स्टेट बँक परिसर, हाउसिंग सोसायटी व प्लॉट परिसरात घराघरांमध्ये जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
ही बातमी ऑनलाईन वाचा-सावदा पालिका निवडणुकीत रेणुका राजेंद्र पाटील यांचा विकासाचा जाहीरनामा चर्चेत; भाजप–शिवसेना युतीचा प्रचार जोरात
मतदारांना आपल्या विकासाभिमुख भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, “स्वच्छ, सुंदर आणि सुबक सावदा शहराची बांधणी तसेच प्रभावी पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
या सोबतच शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अंडरग्राउंड सांडपाणी निचरा व्यवस्था आणि आधुनिक गटारी प्रकल्प राबवण्याचा शब्द त्यांनी मतदारांना दिला.
तडवी यांच्या या योजनांना स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, प्रभागातील मतदार बंधू–भगिनींनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे.
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून शहरहितासाठी आपला विजय आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत