Contact Banner

सावदा येथे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक भाजप उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

 

savda-bjp-nagarparishad-interview


सावदा येथे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक भाजप उमेदवारांच्या मुलाखती संपन्न


सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) सावदा (जळगाव पूर्व) येथे आगामी नगर पालिका निवडणूक लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.


या प्रसंगी जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार संजयभाऊ सावकारे, आमदार अमोलदादा जावळे, जिल्हा अध्यक्ष (जळगाव पूर्व) चंद्रकांतभाऊ बाविस्कर, जिल्हा निवडणूक प्रमुख नंदुभाऊ महाजन, सावदा निवडणूक प्रभारी दुर्गादास पाटील, राजेंद्रभाऊ चौधरी आणि पंकजभाऊ यवले यांची प्रमुख उपस्थिती होती.


या वेळी सरचिटणीस महेश अकोले आणि विनायक कोळी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

नगराध्यक्षपदासाठी ३ इच्छुक तसेच नगरसेवकपदासाठी ३५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.