Contact Banner

सावदा नगरपरिषद निवडणूक : एबी फॉर्मनंतर पक्षचिन्हासह प्रचार; अपक्षही संपर्कात आघाडीवर

 

savda-municipal-election-party-symbol-campaign-independents-lead-outreach


सावदा नगरपरिषद निवडणूक : एबी फॉर्मनंतर पक्षचिन्हासह प्रचार; अपक्षही संपर्कात आघाडीवर


सावदा प्रतिनिधी लेवा जगत न्यूज-सावदा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार जोर पकडत असून भारतीय जनता पार्टी–शिवसेना युती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळणार असून त्यांनी पक्षचिन्हासह थेट जनसंपर्काला वेग दिला आहे.


नगराध्यक्ष पदाचे तसेच प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार घराघरात भेट देत मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. “मी उभा/उभी आहे, मला मतदान करा” असे प्रत्यक्ष आवाहन करत उमेदवार मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संवाद मोहिमेमुळे प्रभागनिहाय राजकीय वातावरण अधिक तापले आहे.


यासोबतच अपक्ष उमेदवारांनीही स्वतंत्र रितीने घराघरात जाऊन भेटी वाढवत प्रचारात आघाडी घेतली आहे. स्वतःचे मुद्दे मांडत मतदारांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अधिकृत चिन्ह जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक प्रचार रंगतदार बनला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.