Contact Banner

सावदा : मतदान प्रक्रियेवर निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण


sawda-karmachari-matadan-process-guidance


सावदा : मतदान प्रक्रियेवर निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

सावदा │ लेवा जगत न्यूज-सावदा नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी आज नगरपरिषद कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी ११ वाजता प्रशिक्षण सत्रास सुरुवात झाली.

या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सावदा पालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वर्मा तसेच पालिका कर्मचारी यांनी सविस्तरपणे केले. मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा, तांत्रिक बाबी तसेच केंद्रावर उद्भवू शकणाऱ्या परिस्थितींवर उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक चित्रफितीद्वारे तसेच मौखिक मार्गदर्शनाद्वारे सविस्तरपणे सादर करण्यात आले. सत्रास निवडणुकीसाठी नियुक्त विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.