सावदा प्रभाग ५ अ — राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा धांडे यांना विकासाच्या संकल्पनांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
सावदा प्रभाग ५ अ — राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा धांडे यांना विकासाच्या संकल्पनांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी): सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वांगीण विकासाचे नवे पर्व सुरू करण्याच्या निर्धारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यापक विकास आराखडा जाहीर केला आहे. “माझा स्मार्ट प्रभाग” या दूरदर्शी संकल्पनेतून प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि सौंदर्यीकरण याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ५ अ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धांडे वर्षा दुर्गादास यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून पिंटू भाऊंच्या सुंदर सावदा शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी एकत्रित पाठिंबा दर्शविला आहे. प्रभागातील रस्ते, गटारी, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, जलव्यवस्था व धार्मिक स्थळांचे संवर्धन या सर्व क्षेत्रात ठोस व पारदर्शक कामे करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रभागातील सोमेश्वर नगर, सुगंगा नगर, पवन नगर येथील काँक्रिट रस्ते, गटारी व पथदिवे सुसज्ज करणे, आवश्यक ठिकाणी हायमास्ट पोल बसविणे, Open Space मधील मंदिरांचे सुशोभिकरण, ओम कॉलनी उद्यानात बालकांसाठी क्रीडा साहित्य, ‘आपला डॉक्टर आपल्या दारी’ आरोग्य योजना, पाणपोई व आधुनिक फिल्टर सिस्टम, Wi-Fi 6, 5G तंत्रज्ञान व CCTV कॅमेरे, रिंग रोडवरील मॉर्निंग वॉक फुटपाथ व पथदिवे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी सुविधा, तसेच पाताळगंगा नदी स्वच्छता व सुशोभिकरण असे उपक्रम अंमलात आणण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी वर्षा धांडे म्हणाल्या की,
“आश्वासन नव्हे, सातत्यात साकार करणार — प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.”
मतदारांना आवाहन :
निशाणी — घड्याळ
समोरील बटन दाबा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मताधिक्याने विजयी करा..!
प्रभाग ५ च्या उज्वल भविष्यासाठी वर्षा दुर्गादास धांडे यांना आपला मौल्यवान कौल द्या..!
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत