ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे वेदमंत्रोच्चारात थाटामाटात तुलसी विवाह संपन्न
ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे वेदमंत्रोच्चारात थाटामाटात तुलसी विवाह संपन्न
सावदा (प्रतिनिधी):-कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला पारंपरिक रीतीने साजरा होणारा तुळशी विवाह हा धार्मिक विधी सावदा येथे ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.
विलास मांगलवाडीकर यांच्या भोईवाडा येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. सभागृह वेदमंत्रोच्चार, मंगलाष्टकांच्या गजराने दुमदुमले होते. फुलांनी सजवलेल्या तुळस आणि श्रीकृष्णाच्या मूर्तींच्या साक्षीने, विलास मांगलवाडीकर कुळकर्णी आणि वनिता मांगलवाडीकर कुळकर्णी या दांपत्याच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने विवाह विधी पार पडला.
कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष सचिन सकळकळे, उपाध्यक्ष प्रदीप कुळकर्णी, कोषाध्यक्ष सानिका मटकरी, कविता सकळकळे, अपूर्वा कुळकर्णी, रितेश सकळकळे, बापू कुलकर्णी, खिरोदा येथील माजी उपसरपंच दिनकर कुलकर्णी, शैला कुळकर्णी, दीपक कुलकर्णी, किरण कुलकर्णी, श्रीकांत मटकरी, सुभाष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
विवाह विधीचे पौरोहित्य निलेश महाराज कुळकर्णी यांनी केले. विधीनंतर आरती, प्रसाद व अल्पोपहार वाटपाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.
तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील शुभ विधी असून, या दिवसानंतरच लग्नसराईचा हंगाम सुरू होतो, असे मानले जाते.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत