Contact Banner

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या आमदार अमोलभाऊ जावळे यांची हिवाळी अधिवेशनात ठोस मागणी

avkaali-pausane-nuksangrast-shetkaryanna-tatadiche-bharpai-amol-javle


अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या आमदार अमोलभाऊ जावळे यांची हिवाळी अधिवेशनात ठोस मागणी

लेवाजगत न्यूज | प्रतिनिधी

नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात रावेर–यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला.

यावल–रावेर मतदारसंघात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्वारी, उडीद, मूग व कपाशी ही पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी नुकसानभरपाई द्यावी, अशी ठोस मागणी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देणे अत्यावश्यक असून शासनाने या गंभीर परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.