मुंबई परिसर सावदा रहिवासी संघाचे २४ वे स्नेहसंमेलन व स्नेहभोजन २१ डिसेंबरला
मुंबई परिसर सावदा रहिवासी संघाचे २४ वे स्नेहसंमेलन व स्नेहभोजन २१डिसेंबरला
लेवाजगत न्यूज डोंबिवली - प्रतिनिधी-मुंबई परिसर सावदा रहिवासी संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ वे स्नेहसंमेलन व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता खडवली येथील स्वामी समर्थ संस्थान, भातसा नदीकाठी येथे संपन्न होणार आहे.
या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नाकर बळीराम चौधरी (बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग – व्हीजेटीआय, मुंबई) हे उपस्थित राहणार आहेत. समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व बालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी संघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रदीप गोविंद पाटील मार्गदर्शन करत असून उपाध्यक्ष म्हणून अशोक भंगाळे, हर्षल अरुण कुरकुरे आणि प्रेमचंद लक्ष्मण सरोदे कार्यरत आहेत. कार्यवाह म्हणून आकाश गिरीधर धांडे तर खजिनदार म्हणून चंद्रकांत पोपट पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.सहकार्यवाह म्हणून दिलीप विठ्ठल नेहते, दीपक (बापू) मोतीराम पाटील आणि प्रशांत चंद्रकांत पाटील हे काम पाहत आहेत. कार्यकारिणीत सभासद म्हणून मनीष अरुण पाटील, किरण अरविंद पाटील, युवराज अर्जुन पाटील, शरद वासुदेव व, सुनील प्रल्हाद वाणी, विवेक मोहन माळवे, सचिन दिनकर नेमाडे, चूडामण टिकाराम सरोदे, सोमनाथ पांडुरंग राणे, युवराज शंकर चौधरी, हर्षल सूर्यकांत पाटील, धनश्याम लिलाधर बेडाळे, अनुराधा प्रकाश कोष्टी, दर्शनी प्रशांत पाटील आणि वैशाली रविंद्र धांडे यांचा समावेश आहे.
सावदा रहिवासी संघाची स्थापना १९ जानेवारी २००० रोजी झाली असून संघाच्या माध्यमातून समाजबांधवांमध्ये एकोपा, आपुलकी व सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सातत्याने केले जाते. स्थलांतरामुळे विविध ठिकाणी विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.
या स्नेहसंमेलनाला समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहावे, असे आवाहन सावदा रहिवासी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत