Contact Banner

अयोध्या दर्शनावरून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा भीषण अपघात

 

ayodhya-prayagraj-luxury-bus-accident-chotibai-patil-death-11-injured


अयोध्या दर्शनावरून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा भीषण अपघात

लेवाजगत न्यूज धरणगाव- तालुक्यातील कल्याणे होळ येथील ३० महिला व ५ पुरुषांसह एरंडोल, पारोळा, पाचोरा येथील एकूण ४४ भाविक प्रभू श्रीरामाच्या अयोध्या दर्शनासाठी गेले होते. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर शनिवार पहाटे सुलतानपूर येथे अयोध्या-प्रयागराज महामार्गावर त्यांच्या लक्झरी बसला मागून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे साधारणत: चार वाजता घडला.

या भीषण अपघातात पिंप्राळ्यातील छोटीबाई शरद पाटील (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून ११ भाविक जखमी झाले आहेत. मृत छोटिबाई पाटील यांचे माहेर कल्याणे आणि सासर पिंप्राळे येथे आहे. अपघातानंतर लक्झरी बस व ट्रेलर दोन्ही उलटल्याने बसमधील प्रवासी अडकले होते. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी धाव घेऊन सर्व जखमींना बाहेर काढले व सुलतानपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा तालुक्यातील भाविक अयोध्या-प्रयागराज-काशी यात्रेसाठी गेले होते. त्यात धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथील ३५ भाविकांचा समावेश होता.


अपघातग्रस्त बसमधील प्रमुख भाविकांची नावे :

संजय प्रताप पाटील, भारत दगडू पाटील, साहेबराव सोनपडू पाटील, पदम हरसिंग पाटील, दगडू घुडकू पाटील, सुमनबाई बुधा पाटील, सुमित्राबाई भारत पाटील, आशाबाई साहेबराव पाटील, निताबाई महेंद्रसिंग पाटील, अर्चना सुधाकर पाटील, संगीता रवींद्र पाटील, रंजना विजय पाटील, इंदुबाई सुधाकर पाटील, योजनाबाई पदम पाटील, आशाबाई बाळू पाटील, सुमित्रा भारत पाटील, साधना राजेंद्र पाटील, इंदुबाई मधुकर पाटील, साहेबराव शंकराव पाटील, रंजनाबाई विजय पाटील, आशाबाई चंद्रसिंग पाटील (रा. कल्याणे होळ) तसेच संगीता हरी पाटील, सलुबाई महेंद्र राजपूत, अनिता सुनील पाटील (रा. बाबरे, ता. पारोळा), कल्पना रामसिंग पाटील, रामसिंग दगडू पाटील (रा. फुलपाट), निशाबाई कैलास पाटील (रा. रामेश्वर), दीपाली कैलास पाटील (निमगाव), अरुणाबाई भारत पाटील (रा. मोहाडी), भारत पाटील (रा. मोहाडी), रत्नाबाई पाटील (नाशिक), जनाबाई पाटील (पुणे), वंदना पाटील (वरणगाव) आदी प्रवासी बसमध्ये होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.