भ्रातृ मंडळ अकोला तर्फे कुलगुरू प्रा. डॉ. विलास खर्चे यांचा भव्य सत्कार
भ्रातृ मंडळ अकोला तर्फे कुलगुरू प्रा. डॉ. विलास खर्चे यांचा भव्य सत्कार
अकोला लेवाजगत न्यूज प्रतिनिधी
भ्रातृ मंडळ, अकोला या सामाजिक संस्थेच्या वतीने यांचा भव्य सत्कार सोहळा शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
येथील माजी मृदा शास्त्रज्ञ व संशोधन संचालक असलेल्या डॉ. खर्चे यांची , राहुरी येथील कुलगुरू पदी महामहीम राज्यपालांनी नियुक्ती केल्याबद्दल हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
सत्काराला उत्तर देताना कुलगुरू प्रा. डॉ. विलास खर्चे यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कृषी क्षेत्रात अधिक भरीव कार्य करण्याची इच्छा व्यक्त करत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होईल अशा अधिक उत्पादनक्षम पिकांच्या जाती विकसित करण्यावर भर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती कुलगुरू प्रा. डॉ. विलास काशिनाथ खर्चे, प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अभियांत्रिकी शाखेचे सेवानिवृत्त अधिष्ठाता , भ्रातृ मंडळ मोताळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे सचिव , तसेच भ्रातृ मंडळ अकोलाचे उपाध्यक्ष आणि उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त अधिष्ठाता श्री एन. एन. नारखेडे यांच्या शुभहस्ते कुलगुरू प्रा. डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. एन. पाटील यांनी डॉ. खर्चे यांच्या सेवाकाळात कृषी संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि कुलगुरू म्हणूनही ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी दिलीपभाऊ नाफडे यांनीही समयोचित विचार मांडले.
कार्यक्रमाला समाजातील प्रतिष्ठित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत