Contact Banner

भ्रातृमंडळ, अकोला चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 

bhratrumandal-akola-che-varshik-snehsammelan-utsahat-sampann


भ्रातृमंडळ, अकोला चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

लेवाजगत न्यूज अकोला-शहरातील प्रभा ले-आऊट, रणपिसे नगर येथे कार्यरत असलेल्या भ्रातृमंडळ या सामाजिक संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी खंडेलवाल भवन, अकोला येथे अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विशेष पाहुणे श्री. भास्कर चांगो पाटील यांचा सन्मान करण्यात आला. परंपरेनुसार संस्थेच्या जेष्ठ नागरिकांचा सपत्नीक सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रणधीर भाऊ सावरकर, आमदार अकोला पूर्व, यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री. एम. एन. पाटील यांनी केले. तसेच भाजप महानगराध्यक्ष व माजी मनपा सभापती, लोकप्रिय नेते जयंत भाऊ मसने यांचे स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. श्री. राजीव इंगळे यांनी केले.

सामाजिक बांधिलकी, आपुलकी व बंधुभाव जपण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. याच उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. सादरकर्त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

सर्व मंडळ पदाधिकारी, सदस्यगण व महिलामंडळाच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. निमंत्रित कुटुंबांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

स्नेहसंमेलनानंतर श्री. नरेंद्र पाटील (बांधकाम व्यवसायिक, अकोला), श्री. विकासभाऊ चोपडे (विजय गॅस एजन्सी, माधव नगर, अकोला) तसेच भ्रातृमंडळ यांच्या संयुक्त देणगीतून स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनानंतर समाधानकारक वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.