फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालयात उत्साहात एड्स जनजागृती अभियान
फैजपूर येथिल धनाजी नाना महाविद्यालयात उत्साहात एड्स जनजागृती अभियान
लेवा जगत न्यूज, फैजपूर — धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने एड्स जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स जनजागृती शपथ देऊन अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमाचे नियोजन व आयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील यांनी केले. तसेच महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. सविता कलवले उपस्थित होत्या.
ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथील आरोग्य कर्मचारी श्री. मनोज चव्हाण आणि श्री. अंकुश महाजन यांनी विद्यार्थ्यांना एड्सविषयी महत्त्वपूर्ण माहिती, रोग प्रतिबंधक उपाय, जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अभियानात एनएसएस स्वयंसेवक अश्विनी पवार, रोहिणी माळी, श्वेता भालेराव, प्रेरणा भालेराव, दीक्षा वानखेडे, मुकेश भावसार, हर्षल महाजन, यश वाणी आणि रोहित पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
पोस्टर प्रदर्शनाद्वारे प्रेरणा भालेराव व कुमकुम राणे यांनी एड्स प्रतिबंध, जागरूकता आणि अफवा दूर करण्याचा प्रभावी संदेश दिला. स्वयंसेवक अश्विनी पवार हिने विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती, रोगप्रसाराचे मार्ग, प्रतिबंधात्मक काळजी आणि समाजातील जबाबदारी यांविषयी सखोल माहिती देत महत्त्वपूर्ण जनजागृती केली.
अभियानाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत