हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वॉन्डो स्पर्धेत रायगडच्या सहा खेळाडूंची निवड
हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वॉन्डो स्पर्धेत रायगडच्या सहा खेळाडूंची निवड
उरण (सुनिल ठाकूर ) : तायक्वॉन्डो फेडरेशन ऑफ इंडिया ही तायक्वॉन्डो खेळाची भारतातील एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेला इंडियन ऑलिंपिक व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली असून महाराष्ट्र मध्ये तायक्वॉ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या अधिकृत राज्य संघटनेने लातुर येथे राज्य स्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर, मुग्धा भोसले, प्रशांत घरात , सेजल कानेकर , अनन्या चितळे व गायत्री भंडारे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकावले.
दिनांक ११ ते १४ डिसेंबर २०२५ बालयोगी इंनडोर स्टेडियम हैदराबाद ,येथे होणाऱ्या सीनियर राष्ट्रीय तायक्वॉन्डो स्पर्धेत प्राजक्ता अंकोलेकर, मुग्धा भोसले, प्रशांत घरत सेजल कानेकर? अनन्या चितळे व गायत्री भंडारे आणि पंच म्हणून तेजस माळी हे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजय खेळाडू जागतिक तायक्वॉन्डो स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत असे तायक्वॉन्डो मुख्य प्रशिक्षक सुभाष पाटील यांनी सांगितले. या खेळाडूंना तायक्वॉन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रायगड तायक्वॉन्डो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी विषय सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत