गोवा : अरपोरा नाईट-क्लबमध्ये भीषण आग; 23 जणांचा मृत्यू, राज्यभरात हळहळ
गोवा : अरपोरा नाईट-क्लबमध्ये भीषण आग; 23 जणांचा मृत्यू, राज्यभरात हळहळ
लेवाजगत न्युज गोवा:- उत्तर गोव्यातील अरपोरा येथील “Birch by Romeo Lane” या लोकप्रिय नाइट-क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. क्लबमध्ये पार्टी सुरू असताना झालेल्या या दुर्घटनेत 23 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत.
स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि काही क्षणात संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. आग इतकी भीषण होती की काही मृतांची ओळख पटवण्यासाठी विशेष प्रक्रिया करावी लागत आहे. मृतांमध्ये पर्यटक, कर्मचारी व काही लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाने तात्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हादर व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत आणि जखमींसाठी आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नाइट-क्लबच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
या घटनेनंतर गोव्यातील अन्य रेस्टॉरंट्स, पब आणि नाइट-क्लब्सच्या अग्निसुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत