65 वर्षीय नगरसेवकाचं 25 वर्षीय तरुणीशी लग्न; काही दिवसांतच संशयास्पद मृत्यू, सुनेचे गंभीर आरोप
65 वर्षीय नगरसेवकाचं 25 वर्षीय तरुणीशी लग्न; काही दिवसांतच संशयास्पद मृत्यू, सुनेचे गंभीर आरोप
लेवाजगत न्युज भोपाल :-
मध्य प्रदेशच्या सागर शहरातील लाजपतपुरा प्रभागाचे नगरसेवक नईम खाम यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. ६७ वर्षीय नईम खान यांनी काही दिवसांपूर्वीच २५ वर्षांच्या तरुणाशी निकाह केला होता. भाजपमधून निलंबन झाल्यानं ते चर्चेत होते. सकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
नईम खान यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर नईम खान यांची सून शिखा खान समोर आली आहे. 'सासरे नईम यांनी सप्टेंबरमध्ये २५ वर्षीय तरुणीशी दुसरा विवाह केला होता. तेव्हापासून ते त्रस्त होते. त्यांच्यात दररोज वाद व्हायचे. त्यामुळे सासरे चिंतेत होते,' असं शिखा यांनी सांगितलं.
नईम खान पहिली पत्नी आणि कुटुंबाला सोडून अन्यत्र वास्तव्यास होते. नईम निपचित पडले असून त्यांची हालचाल होत नसल्याची माहिती त्यांच्या सुनेला सकाळी फोनवर मिळाली. त्यानंतर सुनेनं नईम खान यांचं घर गाठलं. तेव्हा नईम खान मृतानस्थेत आढळून आले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालातून नईम खान यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.
नगरसेवक नईम खान गेल्या अडीच महिन्यांपासून वादात होते. ६७ वर्षांच्या नईम खान यांनी २५ वर्षीय तरुणीशी निकाह केला. याच तरुणीनं आधी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे भाजपनं त्यांच्यावर कारवाई केली. सहा वर्षांसाठी त्यांना पक्षातून काढण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे निकाहानंतर नव्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर गोपालगंज पोलीस ठाण्यात नईम खान यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. नईम खान यांच्या मृ्त्यूचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. हृदय प्रक्रिया बंद पडल्यानं खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. आता पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत