Contact Banner

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे ‘विभूती पूजा’ — डॉ. रवींद्र भोळे

sardar-vallabhbhai-patel-vibhuti-puja-ravindra-bhole-divyaratna-award


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे ‘विभूती पूजा’ — डॉ. रवींद्र भोळे





लेवाजगत न्यूज वडोदरा (गुजरात) — गायत्री विकलांग मानव मंडळ वडोदरा व दिव्यांग विश्व दिन निर्मित संस्थेच्या वतीने वडोदरा येथे विश्व दिव्यांग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्राच्या हितासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय, रचनात्मक कार्य करणाऱ्या १०८ कार्यकर्त्यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल दिव्य रत्न अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. दिव्यांग जनजागृतीसाठी रॅलीचादेखील आयोजन करण्यात आले.

मुख्य पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे महाराज म्हणाले,
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे आयोजित कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा होय. गायत्री विकलांग मानव मंडळाने घेतलेला हा उपक्रम राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणारा आहे. सरदार पटेल यांनी एकसंध भारताची निर्मिती करून महान सेवा बजावली. ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले.”

त्यांनी पुढे सांगितले की, भारताचे पंतप्रधान पूज्य नरेंद्र मोदी यांनी उभारलेले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे देशाच्या वतीने सरदारांच्या कार्याचे भव्य स्मरण आहे आणि कार्यकर्त्यांसाठी सतत स्फूर्ती देणारा झरा आहे.

डॉ. भोळे यांनी सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक, दिव्यांग सेवा क्षेत्रात ३५ वर्षांच्या समर्पित सेवेबद्दल हा पुरस्कार मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
“माझ्या कार्याचे मूल्यमापन झाले आहे; संस्थेचा मी अत्यंत ऋणी आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात डॉ. रवींद्र भोळे, अमोल पाटील, सौ. किरण पाचपांडे यांच्यासह १०८ राष्ट्रीय कार्यकर्त्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यात —
मंत्री श्रीमती मनीषाबेन वकील, सांसद डॉ. हेमांग जोशी, विधायक बालकृष्ण शुक्ला, धर्मेंद्र बापू, केपूर रोकडिया, गायत्री परिवाराचे गिरीश पटेल, राजगोपाल मुंदडा, गिरीश भाई माहेश्वरी, बाबुभाई सी. पटेल, नितेश भाई पटेल, उमेश भाई भुतडा, माजी संसद रंजनबेन भट्ट, विजयभाई शाह, ललित भाई शाह, डॉ. राजेश कोरांट, डॉ. विजय शाह, राजेश आयरे, अनिल भाई शाह, दीपक भाई माहेश्वरी आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे आयोजन गायत्री विकलांग मानव मंडळ वडोदरा संस्थेच्या संचालिका श्रीमती रुक्मिणी देवी माहेश्वरी यांनी केले. समन्वयक म्हणून सुनील भाई शाह, शिवलालजी गोयल, गजानन राठी, मुखराज दोषी, प्रकाशभाई शाह यांनी कार्य केले.

कार्यक्रम आंबे स्कूल, गीतांजली ऑडिटोरियम, समा–सावली रोड, वडोदरा येथे पार पडला.
सूत्रसंचालन डॉ. ललिता जोगड यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती रुक्मिणी देवी माहेश्वरी यांनी केले.

राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातसह अनेक राज्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम भव्य आणि यशस्वी ठरला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.