जीवनात यश मिळवणं महत्त्वाच, पण संस्कार जपणं त्याहूनही अधिक महत्त्वाच – डॉ.सुनील भिरुड
जीवनात यश मिळवणं महत्त्वाच, पण संस्कार जपणं त्याहूनही अधिक महत्त्वाच – डॉ.सुनील भिरुड
चिनावल ( लेवाजगत न्यूज प्रतिनिधी )- नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये दि.२४ डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या कष्टांना, त्यांच्या अभ्यासातील सातत्याला तसेच शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध उपक्रमांतील यशाला सन्मानित करणारा हा सोहळा म्हणजेच पारितोषिक वितरण सोहळा असतो. सर्वप्रथम कार्क्रमची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलाने झाली. त्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीत झाले. पारितोषिक वितरणाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन सर यांनी मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनील गंगाधर भिरुड, कुलगुरू सी.ओ.इ.पी टेक्नॉलजी विद्यापीठ पुणे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी विद्यार्थीना सांगितले की, “यश मिळवणं महत्त्वाचं आहे, पण संस्कार जपणं त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे.”विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतात, त्या शाळेतील संस्कार, शिस्त, मूल्ये आणि मार्गदर्शन त्यांच्या विचारांवर, वागणुकीवर आणि भवितव्यावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करतात, “ज्या वेळी तुम्ही कोणतेही काम हाती घेता, ते काम वेळेचे नियोजन करून लवकरात लवकर आणि उत्तम प्रकारे पूर्ण कसे होईल, याचा विचार नेहमी केला पाहिजे. मोबाईलचा योग्य व सकारात्मक वापर शिकण्यासाठी आणि कौशल्यविकासासाठी कसा करता येईल, याबाबत माहिती देण्यात आली. शाळांनी बदलत्या काळाशी जुळवून घेत आधुनिक शिक्षणपद्धती स्वीकारल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वतःची क्षमता ओळखून विकसित करावी. फक्त नोकरी शोधणारे न राहता,भविष्यात नोकरी देणारे उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एस.डी. भिरूड, सचिव महाराष्ट्र राज्य मध्य. शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, पारवतोषिक वितरण हे मेहनत चिकाटी शिस्त आत्मविश्वास यांचा उत्सव आहे.जो मेहनतीतून जन्म घेतो, चिकाटीने घडतो, शिस्तीतून आकार घेतो आणि आत्मविश्वासाने यशात परिवर्तित होतो. अपयशाने खचू नका, कारण तेच यशाकडे नेणारे पहिले पाऊल असते. नव्या जोमाने, नव्या उमेदीनं प्रयत्न करत राहा. सराव आणि चिकाटीच्या बळावर या वेगवान जगाशी स्पर्धा करून स्वतःला अधिक सक्षम आणि वेगवान बनवा.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. सराव, प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर खचू नका, पुढे चला आणि नक्की यशस्वी व्हा. प्रसंगी अध्यक्ष डॉ. सुनील गंगाधर भिरुड, कुलगुरू सी.ओ.इ.पी टेक्नॉलजी विद्यापीठ पुणे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एस.डी. भिरूड, सचिव महाराष्ट्र राज्य मध्य. शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, अनंत दिनकर पाटील सेवानिवृत्त उप अभियंता जलसिंचन विभाग, दिनकर गंगाधर भिरूड सेवानिवृत्त उप अभियंता जलसिंचन विभाग, दिलीप बोंडे उद्योजक व चेअरमन डिगंबर शेठ नारखेडे फळ विक्री सहकारी सोसायटीची चिनवल, विलास लीलाधर बोंडे उद्योजक जळगाव, सुनील शांताराम महाजन प्रगतिशील शेतकरी चिनावल, चंद्रकांत डोंगर भंगाळे संचालक चंद्रमा ॲग्रोटेक चिनावल, यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेद्र फालक, सेक्रेटरी गोपाल पाटील, चेअरमन खेमचंद्र पाटील,शालेय समिती सदस्य निळकंठ चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, दामोदर महाजन, विनायक महाजन, सुरेश गारसे, अनिल किरंगे, मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापिका मिनल नेमाडे, पर्यवेक्षक पी.एम.जावळे,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश बावस्कर, इंग्लिश मेडीअम चे मुख्याध्यापक जगदीश धांडे, आय.टी. आय.चे प्राचार्य संदीप चौधरी, शिक्षक प्रतिनिधी जि.बी. चोपडे व शिक्षकेतर प्रतिनिधी गिरीष नारखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पारितोषिक विजेत्यांची नावे डी.आर.नेहेते सर यांनी वाचन केले. ईशस्तवन व स्वागत गीत कुलभूषण पाटील सर व शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केले. सूत्रसंचालन जे.आय.तडवी सर व एम एस महाजन सर यांनी केले. तर आभार जी.बी.चोपडे सर यांनी मानले. सदर यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख नितीन महाजन सर, ए. व्ही.राणे, के.टी धांडे, पी. बी. नाफडे, पी. पी. मालखेडे, सी. एस. किरंगे, सिंचन नेहेते, सी.एम.भारंबे, एम.बी पाटील, सचिन पवार, लीनय बोंडे, फारूक तडवी, योगेश बोरोले सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत