Contact Banner

मधुर तळेले बेस्ट एएनओ २०२५ पुरस्काराने सन्मानित.

 

मधुर तळेले बेस्ट एएनओ २०२५  पुरस्काराने सन्मानित.

मधुर तळेले बेस्ट एएनओ २०२५  पुरस्काराने सन्मानित.




लेवा जगत प्रतिनिधी खेमचंद पाटील बदलापूर-असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर वेल्फेअर बोर्ड, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी सन्मान सोहळा रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी स्वामी विवेकानंद हायस्कूल, नेहरूनगर, कुर्ला (मुंबई) येथे आयोजित करण्यात  आला होता त्या कार्यक्रमात एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक भान वाढवण्याचे उद्दिष्ट, तसेच एनसीसी अधिकारी कॅडेट्स यांच्या निष्ठा, सेवाभाव आणि राष्ट्रीय बांधिलकीचा गौरव करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता.

         कार्तिका हायस्कूल आणि जूनियर कॉलेज कुर्ला (मुंबई) येथील एनसीसी ऑफिसर श्री मधुर भानुदास तळेले (सहाय्यक शिक्षक) यांना त्यांच्या एनसीसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट एन.सी.सी. ऑफिसर बेस्ट ए.एन.ओ २०२५  पुरस्काराने  ब्रिगेडियर शिरीष ढोबळे (सेवा निवृत्त थल सेना अधिकारी) आणि कॅप्टन मनोज भामरे (सेवा निवृत्त थल सेना अधिकारी) या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

    एनसीसी ऑफिसर श्री मधुर भानुदास तळेले यांनी आपल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅसेट्स ला सन २०२२ मध्ये बेस्ट कॅडेट, सन २०२३ मध्ये बेस्ट ड्रिल कॅडेट व मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, सन २०२४ मध्ये एनसीसी क्षेत्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, सन २०२५ मध्ये रॉक क्लाइंबिंग सारखे पारितोषिके मिळविलेली आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यमध्येही राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सचा सहभाग असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.