पंचवार्षिक खंडानंतर शिवसेनेचा दमदार पुनरागमन; ७ पैकी ५ जागांवर विजय, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत प्रभावी एन्ट्री
पंचवार्षिक खंडानंतर शिवसेनेचा दमदार पुनरागमन; ७ पैकी ५ जागांवर विजय, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत प्रभावी एन्ट्री
लेवाजगत न्युज सावदा:-
नगरपालिका निवडणुकीत एक पंचवार्षिक खंडानंतर ने पुन्हा जोरदार पुनरागमन करत पाच नगरसेवक निवडून आणले आहेत. या यशामुळे सावदा नगरपरिषदेच्या राजकारणात शिवसेनेचे अस्तित्व पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाले असून, आमदार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पाच शिलेदार पालिकेत प्रवेश करत आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेने भाजपा–शिवसेना युतीकडून एकूण ७ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ५ जागांवर विजय मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे लढवलेल्या जागांच्या तुलनेत शिवसेनेचा विजयाचा टक्का लक्षणीय ठरला असून, हा पक्षासाठी मोठा राजकीय संदेश मानला जात आहे.
थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपा–शिवसेना युतीचा विजय झाल्याने, आगामी काळात पालिकेच्या कारभारात शिवसेनेचे योगदान अधिक प्रभावी राहणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
हे आहेत शिवसेनेचे विजयी पाच विजयी शिलेदार
फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण – प्रभाग क्रमांक २ (बिनविरोध)
पठाण तबस्सुम बानो फिरोज खान – प्रभाग क्रमांक २ (जागा ‘ब’) (बिनविरोध)
प्रतीक्षा मनीष भंगाळे – प्रभाग क्रमांक ६ (जागा ‘अ’)
फिरोजखा अबदार खा – प्रभाग क्रमांक ६ (जागा ‘ब’)
रुखसार शेख सलीम अहमद पिंजारी – प्रभाग क्रमांक १० (जागा ‘अ’)
या पाचही नगरसेवकांच्या विजयामुळे शिवसेनेने तळागाळातील संघटनबळ, कार्यकर्त्यांची मेहनत आणि प्रभावी नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेषतः आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आलेल्या रणनीतीचा थेट फायदा पक्षाला झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिकेतील बदलते राजकीय चित्र
निवडणूक निकालानंतर पालिकेतील पक्षीय बलाबल स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस हा संख्याबळाच्या दृष्टीने सर्वात मोठा पक्ष असला, तरी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर भाजप–शिवसेना युतीचा विजय झाल्याने सत्तास्थापन व निर्णयप्रक्रियेत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
एक पंचवार्षिक कालावधी पालिकेबाहेर राहिल्यानंतर मिळालेले हे यश शिवसेनेसाठी नवसंजीवनी देणारे ठरत असून, शहराच्या विकासकामांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक सक्रिय, आक्रमक व निर्णायक भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षनेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत