सातव्या राष्ट्रीय सिख योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णयश
सातव्या राष्ट्रीय सिख योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णयश
अमृतसर (पंजाब) | प्रतिनिधी-
यांच्या वतीने आयोजित सातव्या राष्ट्रीय सिख क्रीडा स्पर्धा – २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राच्या तसेच जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.
येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या योगासन स्पर्धेत श्रीमती ज्योती मुरलीधर वानखेडे (प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा वांजोळा, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव) यांनी उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
योगासन क्षेत्रातील ही स्पर्धा देशभरातील नामवंत खेळाडूंच्या सहभागामुळे अत्यंत चुरशीची आणि मानाची मानली जाते. विविध राज्यांतील स्पर्धकांमध्ये झालेल्या कठीण स्पर्धेत ज्योती वानखेडे यांनी आपले कौशल्य, शारीरिक लवचिकता, शिस्तबद्ध सादरीकरण आणि आत्मविश्वासपूर्ण योगासनांच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली.
या यशामागे त्यांची अथक मेहनत, सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि योगावर असलेली निष्ठा महत्त्वाची ठरली आहे. एकीकडे अध्यापनाची जबाबदारी सांभाळत, दुसरीकडे नियमित सराव करून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर हे घवघवीत यश मिळवले आहे.
या सुवर्णयशानंतर श्रीमती ज्योती मुरलीधर वानखेडे यांची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, ही स्पर्धा जानेवारी २०२६ दरम्यान येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा गौरव अधिकच वाढला आहे.
या यशाबद्दल शाळेतील सहकारी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षण विभाग तसेच क्रीडा व योगप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत असून, जळगाव जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला त्यांनी मोठा अभिमान मिळवून दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत