Contact Banner

सावदा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा गट स्थापन राजेश वानखेडे गटनेते, विजया जावळे प्रदोत पदी एकमताने नियुक्त

 

savda-paliket-rashtrawadi-congress-nagarsevakanchya-gatachi-sthapana-rajesh-wankhede-gatneta-vijaya-jawale-pradot-padi-ekmatane-niyukt


सावदा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा गट स्थापन

राजेश वानखेडे गटनेते, विजया जावळे प्रदोत पदी एकमताने नियुक्त

लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सावदा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज बुधवार रोजी दुपारी जिल्हाधिकारी यांच्यासमोर अधिकृतपणे नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला. या गटामध्ये माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश गजाननराव वानखेडे यांची गटनेतेपदी, तर नगरसेविका विजया कुशल जावळे यांची प्रदोत पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमधून एकमताने नियुक्ती करण्यात आली. या निवडीस जिल्हाधिकारी यांनी अधिकृत मान्यता दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या प्रक्रियेदरम्यान माजी नगराध्यक्ष राजेश गजाननराव वानखेडे, नवनियुक्त प्रदोत विजया कुशल जावळे, तसेच नगरसेवक रेखा राजेश वानखेडे, सिमरन राजेश वानखेडे, सीमा वेळू लोखंडे, विशाल प्रेमचंद तायडे आणि हेमंत महाजन हे सर्व उपस्थित होते. सर्व नगरसेवकांच्या सहमतीने ही निवड प्रक्रिया पार पडली.

या निवडीबद्दल राजेश वानखेडे व विजया जावळे यांचे आप्तेष्ट, पक्ष कार्यकर्ते व समर्थकांनी अभिनंदन केले असून, सावदा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.