Contact Banner

सावदा येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवकांचा श्री स्वामीनारायण मंदिरात भव्य सत्कार

savda-yethe-navnirvachit-lokniyukt-nagaradhyaksha-va-nagarsevkancha-shri-swaminarayan-mandirat-bhavya-satkar


सावदा येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवकांचा श्री स्वामीनारायण मंदिरात भव्य सत्कार

लेवाजगत न्यूज सावदा -

येथे आज संध्याकाळी ठीक ५ वाजता सावदा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा, तसेच सत्कार समारंभाला उपस्थित असलेल्या नगरसेवकांचा पारंपरिक, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. नगरपरिषद निवडणुकीनंतर प्रथमच सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

या समारंभात मंदिराचे कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी यांच्या हस्ते तसेच शास्त्री विश्वप्रकाश दासजी, शास्त्री भक्तीप्रिय दासजी आणि शास्त्री धर्मकिशोर दासजी यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांना मोत्याची माळ व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संत-महंतांनी आपल्या आशीर्वचनातून लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सावदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले.
“असा विकास करून दाखवा की पुढील पंचवार्षिक निवडणुकीत जनतेला हेच नगरसेवक पुन्हा पाहिजे वाटले पाहिजेत,” असे मोलाचे आशीर्वाद यावेळी देण्यात आले.

या सत्कार समारंभास मंदिराचे विश्वस्त चंद्रशेखर पाटील, डॉ. अजितकुमार पाटील, धनंजय चौधरी, शिवाजी भारंबे,संतोष भंगाळे  यांच्यासह मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंदिराचे विश्वस्त नंदकुमार पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, शिस्त आणि सकारात्मकतेच्या वातावरणात पार पडला.

दरम्यान, या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले नगरसेवक प्रभाग क्रमांक १ मधून विशाल भागवत सोनवणे (अपक्ष)सिमरन राजेश वानखेडे (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग क्रमांक २ मधून राजेश गजानन वानखेडे (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग क्रमांक ३ मधून विशाल प्रेमचंद तायडे (राष्ट्रवादी काँग्रेस)सुनीता संजय तायडे (अपक्ष),
प्रभाग क्रमांक ४ मधून नकुल नितीन बेंडाळे (भारतीय जनता पार्टी),प्रभाग क्रमांक ५ मधून जयश्री अतुल नेहतेसचिन चुडामण ब-हाटे (दोन्ही भारतीय जनता पार्टी),
प्रभाग क्रमांक ६ मधून प्रतीक्षा मनीष भंगाळे (शिवसेना),
प्रभाग क्रमांक ७ मधून रंजना जितेंद्र भारंबे (भारतीय जनता पार्टी – बिनविरोध)श्याम अविनाश अकोले (अपक्ष),
प्रभाग क्रमांक ८ मधून सीमा वेडू लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)पंकज राजाराम येवले (भारतीय जनता पार्टी),
प्रभाग क्रमांक ९ मधून रेखा राजेश वानखेडेहेमंत रुपा महाजन (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
आणि प्रभाग क्रमांक १० मधून रुखसार शेख सलीम अहमद पिंजारी (शिवसेना) यांचे अनुपस्तीतीत त्यांचे पती सलीम पिंजारी यांनी सत्कार स्वीकारला व  नगरसेवक उपस्थित होते.

या भक्तिमय सत्कार समारंभामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच सत्कार समारंभाला उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सावदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय सहकार्याने व लोकहिताच्या दृष्टीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.