Contact Banner

१५ वर्षीय बालिकेच्या कॉर्नियल टियरवर यशस्वी शस्त्रक्रिया दृष्टी वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञांना यश

 

15-varshiya-balikachya-corneal-tear-var-yashasvi-shastrakriya-drishti-vachavnyat-dr-ulhas-patil-vaidkiya-rugnalayatil-netratadnyanna-yash

१५ वर्षीय बालिकेच्या कॉर्नियल टियरवर यशस्वी शस्त्रक्रिया
दृष्टी वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील  नेत्रतज्ज्ञांना यश

लेवाजगत न्यूज, जळगाव :
घरात खेळत असताना झालेल्या अपघातात १५ वर्षीय बालिकेच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. काठीचा फटका बसल्याने डोळ्यातील बुबुळाचा पारदर्शक पडदा (कॉर्निया) फाटून मोतीबिंदू तयार झाला. मात्र जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञांच्या तत्काळ व अचूक उपचारांमुळे बालिकेची दृष्टी वाचवण्यात यश आले.

भुसावळ येथील पूजा जाधव (वय १५) हिच्या डोळ्याला घरात खेळताना काठीचा जोरदार फटका बसला होता. त्यानंतर अचानक दृष्टी धूसर होणे, तीव्र वेदना आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसू लागली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले.

रूग्णालयात विभागप्रमुख , , यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सखोल तपासणी केली. तपासणीत बालिकेला ‘कॉर्नियल टियर’ हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे निदान झाले. डोळ्याच्या पुढील पारदर्शक पडद्याला झालेली फट दृष्टीसाठी अत्यंत धोकादायक असून वेळेत उपचार न झाल्यास कायमस्वरूपी अंधत्व येण्याची शक्यता असते.

ही बाब लक्षात घेऊन नेत्रतज्ज्ञांनी पालकांना आजाराची तीव्रता समजावून सांगत तातडीच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या सहाय्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान फाटलेला कॉर्निया दुरुस्त करण्यात आला तसेच अपघातामुळे तयार झालेला मोतीबिंदूही काढण्यात आला.

विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. शस्त्रक्रियेनंतर बालिकेची प्रकृती समाधानकारक राहिली असून दुसऱ्याच दिवशी तपासणीनंतर तिला रूग्णालयातून सुटी देण्यात आली.

पालकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी इतरांना आवाहन केले आहे की, मुलं खेळताना त्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. डोळ्याला कोणतीही इजा झाल्यास विलंब न करता तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करून घ्यावी. वेळेवर उपचार केल्यास दृष्टी वाचवता येते.


“डोळ्याला झालेली कोणतीही दुखापत हलक्यात घेऊ नये. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत डोळ्याला मार लागल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते. कॉर्नियल टियरसारखा आजार वेळेत ओळखून उपचार केल्यास दृष्टी वाचवता येते; उशीर झाल्यास कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.”
डॉ. उर्मी गायकवाड,
निवासी नेत्रतज्ज्ञ,
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय, जळगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.