नूतन इंग्लीश मिडियम स्कूल, चिनावल येथे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
नूतन इंग्लीश मिडियम स्कूल, चिनावल येथे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
चिनावल लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
नूतन इंग्लीश मिडियम स्कूल, चिनावल येथे आज महिला पालकांसाठी पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शाळेतील महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह व सांस्कृतिक चैतन्याने भारलेले होते.
भारतीय संस्कृतीत हळदी-कुंकू कार्यक्रमाला विशेष महत्त्व असून महिलांमध्ये सामाजिक सलोखा, स्नेहभाव व परस्पर सुसंवाद वाढावा, तसेच परंपरा जपल्या जाव्यात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिपल पाटील मॅडम (प्रायमरी हेल्थ ऑफिसर) उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी महिलांचे आरोग्य, स्वच्छता, पोषण आहार व कुटुंबातील आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच नूतन मराठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मीनाक्षी नेमाडे मॅडम , दिपल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . त्यांनी शालेय उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो, असे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांमध्ये कविता किरंगे, शोभा चौधरी, पोर्णिमा पाटील आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपाली पाटील मॅडम यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी माधुरी महाजन मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, महिला भगिनी, शिक्षकवर्ग व सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नूतन इंग्लीश मिडियम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करून मेहनत घेतली. सजावट, पाहुण्यांचे स्वागत, चहा कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली तसेच परंपरेला आधुनिकतेची जोड देत सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करत अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत