Contact Banner

१९८८ बॅचच्या पोलीस बांधवांचा गेट-टुगेदर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार

 

1988-police-batch-get-together-retirement-felicitation-akola-jan-2026


१९८८ बॅचच्या पोलीस बांधवांचा गेट-टुगेदर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार

लेवाजगत न्यूज | अकोला

दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सन १९८८ बॅचमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) तसेच १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या बांधवांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात पोलीस विभागातून राजीनामा देऊन भूमी अभिलेख विभागात उपसंचालक पदापर्यंत खडतर वाटचाल करून सेवानिवृत्त झालेले बॅचमेट श्री गजानन डाबेराव (उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दीर्घ काळानंतर एकमेकांची भेट झाल्याने सर्व पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. उपस्थित सर्वांनी परस्परांशी आपुलकीने संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही बांधवांनी खास वेळ काढून बाहेरगावाहून उपस्थिती लावली, हे विशेष उल्लेखनीय ठरले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन डाबेराव यांच्यासह श्री यशवंत शिंदे, श्री विलास इंगळे, श्री संजय गायकवाड, श्री लक्ष्मण कोल्हे व श्री मधुकर महल्ले उपस्थित होते.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक संतोष तिवारी, महिला पोलीस उपनिरीक्षक सुनील मुजुमदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजपालसिंग ठाकूर, निलेश भाऊ तायडे व दिनेश भाऊ चौधरी यांचा यशोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान अनेक बांधवांनी मनोगते व्यक्त केली. भविष्यात अशा कार्यक्रमांबरोबरच सुख-दुःखातही एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तसेच आपले मार्गदर्शक व प्रेरणास्थान गोकुलचंद्रन यांना सहकुटुंब आगामी कार्यक्रमास निमंत्रित करावे, अशी सूचना काही सहकाऱ्यांनी मांडली.

काही बांधवांनी स्वयंस्फूर्तीने कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान जाहीर केले, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली. पुढील उपक्रमांची आखणी करण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी मागील गेट-टुगेदरचा जमा-खर्चाचा सविस्तर लेखाजोखा सादर करून श्री समाधान भाऊ जामनिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यानंतर सर्व उपस्थितांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमात श्री वासुदेव इंगळे, एकनाथ चक्रनारायण, अनिल भाऊ खिल्लारे, विदेश भाऊ खांडेकर व गणेश भाऊ जंजाळ यांनी सुमधुर गीतगायन करून कार्यक्रमात रंगत आणली.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॅशियर समाधान भाऊ जामनिक व श्रीकृष्ण इंगळे यांनी निधी नियोजनाची जबाबदारी पार पाडली. तसेच आयोजन समिती व ग्रुप ॲडमिन श्री विजय खर्चे, मनोज बेंद्रे, समाधान जामनिक, श्रीकृष्ण इंगळे, सुरेश महल्ले व बाबुराव लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

भविष्यातही असेच एकोप्याचे व आपुलकीचे उपक्रम राबवून त्यास सर्वांचा भरघोस प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा आयोजन समितीने व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.