भाजप सर्वात मोठा पक्ष; तरी महापौर ठाकरे गटाचाच होणार?
भाजप सर्वात मोठा पक्ष; तरी महापौर ठाकरे गटाचाच होणार?
लेवाजगत न्यूज मुंबई — मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत अनुकूल पत्ते पडल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचाच महापौर होईल, असा नवा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. या दाव्याला कारण ठरत आहेत ठाकरे गटाकडे असलेली दोन “हुकमी एक्के”, ज्यामुळे चर्चांना जोर आला आहे.
यांनी दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधताना “देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल,” असे विधान केले होते. त्यानंतर मुंबईच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या, तर ठाकरे बंधूंच्या गटाला ७१ जागा मिळाल्या. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) २९ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. निवडणुकीनंतर फोडाफोडीच्या भीतीने यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा महापौर होण्याची शक्यता अधिक चर्चेत आहे.
येत्या २२ जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. त्यातून कोणत्या प्रवर्गाचा महापौर निवडला जाणार, हे स्पष्ट होईल. निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार दोन प्रभाग अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव होते—प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१. या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले.
प्रभाग ५३ मध्ये ठाकरे गटाचे जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाचे अशोक खांडवे यांचा पराभव केला, तर प्रभाग १२१ मध्ये ठाकरे गटाच्या प्रियदर्शनी ठाकरे यांनी प्रतिमा खोपडे यांना मात दिली. इतर कोणत्याही पक्षाकडे एसटी प्रवर्गाचा विजयी उमेदवार नसल्याने, आरक्षण सोडतीत महापौर पद एसटीला सुटल्यास ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, भाजप–ठाकरे गट युतीच्या चर्चांवरही राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण देताना, “देवाच्या मनात म्हणजे मी नाही; महापौर महायुतीचाच होईल,” असे विधान केले. तरीही अंतिम चित्र आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष २२ जानेवारीकडे लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत