Contact Banner

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; सीडीएस-६६ पूर्व प्रशिक्षणासाठी आवाहन


भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; सीडीएस-६६ पूर्व प्रशिक्षणासाठी आवाहन

लेवाजगत न्युज नाशिक:-


भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ‘कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस)’ परीक्षेच्या तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे १९ जानेवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६६ आयोजित करण्यात येणार आहे.

या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दि. १८ जानेवारी २०२६ पर्यंत संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले सीडीएस-६६ अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत देण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच त्यासोबतची परिशिष्टे तीन प्रतींमध्ये भरून सादर करणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन सुविधा देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमासाठी पात्रतेच्या अटींमध्ये उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी ०२५३-२४५१०३२ किंवा ९१५६०७३३०६ (व्हॉट्सअ‍ॅप) या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.