Contact Banner

बदलापूर MIDC मध्ये भीषण दुर्घटना; कंपनीत 8 ते 10 स्फोट, धुराचे लोळ आकाशात


 बदलापूर MIDC मध्ये भीषण दुर्घटना; कंपनीत 8 ते 10 स्फोट, धुराचे लोळ आकाशात

लेवाजगत न्युज बदलापूर:- राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुराळा सुरु आहे. राज्यातील 29 मोठ्या शहारांमध्ये महापालिकांची धामधूम सुरु आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात आहेत. पण मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच ठाण्यातील एक अनपेक्षित घटना समोर येत आहे. ठाण्यातील बदलापूर शहरात एक दुखद आणि दुर्देवी घटना समोर येत आहे. बदलापूरमध्ये एका कंपनीत मोठे स्फोट झाले आहेत.

या स्फोटामुळे परिसरात अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या घटनास्थळी पोलीस, पालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन अग्निशामक दलाचे जवान घटानस्थळी दाखल झाले आहेत. परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठे स्फोट झाले आहेत. बदलापूर शहरात आज रात्री नऊच्या सुमारास जनजीवन सुरळीत सुरु होतं. सकाळी ऑफिसला गेलेले नागरिक घरी परतले होते. तर अनेक जण रात्रीची शिफ्ट करण्यासाठी कामावर जात होते. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यवस्त होतं. कुणी आपापल्या घरी आपापल्या कामात बिझी होतं. काही जण घरात टीव्ही पाहत होते. काही जण घरात जेवण करत होते. अनेक जण विश्रांती घेत होते. कुणी झोपलं होतं. रात्रीची वेळ असल्याने शहर आता शांततेकडे झुकत होतं. पण असं असताना अचानक मोठे स्फोट झाले. या स्फोटाने संपूर्ण शहर हादरलं आहे.

खरवई एमआयडीसी परिसरात पॅसिफिक केमिकल कंपनी आहे. याच कंपनीत आज मोठं संकट ओढावलं आहे. कंपनीत शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या शॉर्ट सर्किटनंतर कंपनीत मोठमोठे स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने जमीन मोठ्या प्रमाणात हादरली. परिसरातील नागरीक भयभीत होऊन नेमकं काय झालं? हे पाहण्यासाठी बाहेर आले. विशेष म्हणजे स्फोटांची मालिका ही सुरुच होती. यावेळी तब्बल 8 ते 10 मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे.

पॅसिफिक कंपनीतील स्फोटानंतर कंपनीत मोठी आग लागली. आगीचे धग इतके मोठे आहेत की, आजूबाजूच्या कंपन्यांनाही मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परिसरात धुराचे मोठे लोट हवेत मिसळताना दिसत आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित परिसर पूर्णपणे खाली केला आहे. या घटनेत जीवितहानी झालीय का? ते अद्याप समजू शकलेलं नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.