धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP–2020) विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP–2020) विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
लेवाजगत न्यूज | फैजपूर प्रतिनिधी
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) अंतर्गत शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अनुदानातून , जळगाव आणि , फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिरीषदादा चौधरी व संस्थाचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, उद्घाटक प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे (कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद), प्रमुख अतिथी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य श्री. नरेंद्र नारखेडे, सिनेट सदस्य प्रा. डॉ. पी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. लता मोरे, डॉ. केतन नारखेडे, डॉ. जयंत नेहते, उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. हरिष नेमाडे तसेच कार्यशाळा समन्वयक डॉ. राकेश तळेले उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी NEP-2020 मधील आंतरविद्याशाखीय शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली. बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत मानवी संसाधन विकासासाठी भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित, बहुभाषिक शिक्षणव्यवस्थेचा समावेश असलेले हे धोरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी या नव्या धोरणाला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी श्री. नरेंद्र नारखेडे यांनी भारताला जागतिक पातळीवर नेतृत्वाची संधी मिळण्यासाठी शिक्षणक्षेत्रात बदलत्या गरजांनुसार नवी दिशा ठरवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी स्वातंत्र्यानंतर देशात तीन महत्त्वाची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे राबविण्यात आल्याचे सांगून, सुजाण व कार्यक्षम नागरिक घडवणे आणि जगाला नवी दिशा देणे हीच या धोरणांची मूलभूत अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले.
कार्यशाळेत चार सत्रांत तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले—
- पहिले सत्र: प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे – आंतरविद्याशाखीय शिक्षणाची भूमिका
- दुसरे सत्र: डॉ. केतन नारखेडे (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) – समुदाय सहभाग उपक्रम व क्षेत्रीय प्रकल्प
- तिसरे सत्र: प्राचार्य डॉ. लता मोरे (शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा) – NEP-2020 आणि कौशल्य विकास
- चौथे सत्र: डॉ. जयंत नेहते (सरदार पटेल महाविद्यालय, ऐनपूर) – इंटर्नशिपची अंमलबजावणी
या कार्यशाळेत कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद; सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर; श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर; कला व विज्ञान महाविद्यालय, पाल; जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर; धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर; तसेच मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी, फैजपूर येथील १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राकेश तळेले (केमिस्ट्री), डॉ. विजय एकनाथजी सोनजे, डॉ. हरिष तळेले, डॉ. ताराचंद सावसाकडे, डॉ. शिवाजी मगर, मच्छिंद्र पाटील, अचल भागे, पल्लवी भंगाळे, विकास वाघुळदे, डॉ. योगेश तायडे, नाहीदा कुरेशी, राकेश तळेले (फिजिक्स), पूजा महाजन, पूजा धनगर, शेखर महाजन, अरुण सैदाने, संगम फिरके आदी प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत