धनाजी नाना महाविद्यालयात विश्व हिंदी दिवसाचे उत्साहात आयोजन
धनाजी नाना महाविद्यालयात विश्व हिंदी दिवसाचे उत्साहात आयोजन
लेवाजगत न्यूज फैजपूर -येथील धनाजी नाना महाविद्यालयात पदव्युत्तर हिंदी विभागाद्वारे सालाबादाप्रमाणे 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवसाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून तापी परिसर विद्या मंडळाचे कार्यकारणीचे सभासद माजी प्राचार्य श्री एस एस पाटील म्हणून लाभले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी वाघुळदे यांनी भूषविले. प्रमुख वक्तव्यात श्री पाटील सर यांनी तापी परिसर विद्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी (माजी विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांच्या विश्व हिंदी संमेलनात महत्त्वपूर्ण योगदान विषयी व त्यांच्या महनीय कार्याविषयी थोडक्यात प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोपात माननीय प्राचार्यांनी बाळासाहेबांच्या हिंदी व हिंदी प्रेमाविषयी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रो.एम झेड सुरवाडे प्रो. कल्पना पाटील प्रो.हरीश नेमाडे प्रा.विजय सोनजे व महाविद्यालयातील सर्व विषयांचे प्राध्यापक विद्यार्थी मित्रांनी आपली उपस्थिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व आभार प्रदर्शन प्रो. ईश्वर ठाकूर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत