लेवा पाटीदार समाज वाकडच्या पाचव्या स्नेह संमेलनात 'लेवा विमेन अॅचिव्हर्स २०२६' पुरस्काराने महिलांना प्रोत्साहन
लेवा पाटीदार समाज वाकडच्या पाचव्या स्नेह संमेलनात 'लेवा विमेन अॅचिव्हर्स २०२६' पुरस्काराने महिलांना प्रोत्साहन!
लेवाजगत - खेमचंद पाटील- लेवा पाटीदार समाज वाकडच्या वतीने आयोजित पाचवे वार्षिक स्नेह संमेलन १८ जानेवारी रोजी थोपटे लॉन्स, रहाटणी येथे भव्य उत्साहात पार पडले. हजारो समाजबांधवांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुहास वारके (अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा), श्री. अरुण बोरोले (अध्यक्ष, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ), डॉ. सौ. केतकी पाटील (गोदावरी फाउंडेशन संचालक व भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष), श्री. सचिन बधे (DCP, मुंबई), मा. नामदेवदादा ढाके (मा. सत्तारूढ नेते भाजपा,पि
चि. म. न. पा.), मा. डॉ. मिलिंददादा चौधरी (जळगाव लेवा समाज अध्यक्ष व LMC चेअरमन) आणि सौ. सुरेखा भंगाळे (भंगाळे गोल्ड आणि सिल्क) उपस्थित राहिले. या मान्यवरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करून सोहळ्याला विशेष उंची दिली. हळदी-कुंकू, बोरन्हान सोहळ्यांनंतर प्रायोजक व इतर लेवा मंडळ अध्यक्षांचा सत्कार झाला. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रातील ३५ कर्तृत्ववान महिलांचा 'Leva Womens Achievers 2026' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सचिव श्री. गौरव भंगाळे यांनी मंडळाच्या कार्यकारिणी महिलांचा सत्कार करून सर्वांचे आभार मानले.
सांस्कृतिक कार्यक्रमात लहान-मोठ्यांनी कला कौशल्यांचे प्रदर्शन केले. यावेळी लेवा समाजाचे पहिले ई-मॅगझिन 'लेवा प्रतिबिंब' (#गो-ग्रीन) लाँच झाले, जे सौ. रक्षा चौधरी, सौ. शीतल पाटील, श्री. गिरीश भारंबे, सौ. कल्याणी भारंबे, सौ. जागृती फेगडे व डॉ. पियुष चौधरी यांच्या परिश्रमातून सादर झाले.
सोहळ्यात बोलताना अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी म्हणाले, "Leva Womens Achievers 2026 हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केला आहे. सन्मानित पुरस्कारार्थींच्या कार्याने आम्हा सर्वांना प्रेरणा मिळते. भविष्यातही अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहू."
कार्यक्रमाला श्री. चंदन महाजन, श्री. विजय फालक, श्री. नीलेश धांडे, श्री. गुणेश महाजन, श्री. राहुल झांबरे, श्री. लोकेश नेहेते, श्री. अंकुश चौधरी, सौ. संगीता चौधरी, सौ. स्मिता कोल्हे, सौ. सपना बधे, श्री. अतुल चौधरी, श्री. जयंत चौधरी, ई-मॅगझिन टीम व सर्व सहकार्यांनी हातभार लावला. उपस्थितांनी खानदेशी भरीत-पुरी, कढी व गुळाची जिलेबीचा आस्वाद घेतला. युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम व सांस्कृतिक उत्सवांतून समाजसेवेला नवे आयाम मिळाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत