Contact Banner

माजी महापौर विष्णू भंगाळे यांना धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल महापालिका निवडणुकीतील वादाचा परिणाम

 

माजी महापौर विष्णू भंगाळे यांना धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

महापालिका निवडणुकीतील वादाचा परिणाम

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी जळगाव |

महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जुन्या वादातून माजी महापौर यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी रात्री विष्णू भंगाळे हे आपल्या मित्रांसोबत उभे असताना ओळखीचा आरोपी प्रशांत चौधरी व त्याच्यासोबत असलेल्या एका इसमाने त्यांना गाठले. “आमचा उमेदवार निवडणुकीत पडला” असे म्हणत आरोपींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच “तुमची रक्ताची होळी करू” अशी जिवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर विष्णू भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९६ व ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक राजेश पदमर करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.