Contact Banner

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘पायरेक्सीया २०२६’ क्रीडा महोत्सवाचा थाटात शुभारंभ


डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘पायरेक्सीया २०२६’ क्रीडा महोत्सवाचा थाटात शुभारंभ

लेवाजगत न्युज जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिरथ बॅचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पायरेक्सीया २०२६’ या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ मंगळवारी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. खेळाडूंच्या जोशपूर्ण उपस्थितीने आणि जल्लोषात या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली.

दि. २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन व फुटसल अशा विविध खेळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना व नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच खेळालाही समान महत्त्व देण्याचे आवाहन केले. “खेळामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक सुदृढताही वाढते,” असे त्या म्हणाल्या.

पाच दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.